“रंग माझा ओळखावा ......”
“Beauty is not
about having a pretty face .It is about having a pretty mind,
a pretty heart
& most importantly a pretty soul.”
चुकीच्या व्यक्तीसाठीकेल्या
त्याच्या सावळ्या वर्णा मुळे तिने त्याला नापसंद केलं..
तरी चोकलेट डे ला त्याने तिला सुंदर कव्हरच चोकलेट दिलं..
तिने जेव्हां उघडून पाहिलं तर ते रिकामच निघालं,,,
मग तिने फोन करून त्याला विचारलं कां रे मला फसवलं..??
.
.
.
तो म्हणाला वरच्या रंगला भुलून,
ज्याने जीवनाचा साथीदार ठरवला
त्याने आत मध्ये काय आहे,
हे पाहायचं तरी कशाला...!!!
थोडक्यात काय.... “मला माझा सावळा रंग आवडतो. चेहऱ्याचा रंग बदलून माणसं बदलतात यावर
माझा विश्वास नाही. त्वचेच्या रंगावरून माणसं जोखणाऱ्यांच्या यादीत मला माझं नाव नकोय….
गोरा रंग असणे म्हणजेच सौंदर्य ही आजची परिभाषा बनली अहे. त्यामुळे लग्नासाठी मुलगी ही उंच,
गोरीच हवी. वर्षानुवर्षे लग्नाच्या बाजारात ही मागणी आहे. सावळ्या मुली कर्तृृत्ववान असल्या तरी
रंगामुळे नाकारल्या जातात. काळ्या – सावळ्या मुली जन्मापासूनच “मार खाल्लेल्या’ असतात.
त्या कर्तृत्ववान असल्या तरी रंगामुळे मार खातात. त्यांचा आत्मविश्वास हरवतो.
युरोपियनांच्या दृष्टीने भारतीय काळेच आहेत. काळ्या रंगाच्या द्वेषापोटी युरोपीय निग्रोंचा
द्वेष करतात. इथला दलित आणि तिथला निग्रो हे वंशवादाचे आणि वंशविद्वेषाचे बळी ठरले आहेत.
काळा रंग, अशुभ मानला जातो. पण उभ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठू माऊलीचा, राम-कृष्णाचा रंगही
काळा आहे, गडद काळा आहे. मग आपण आपल्या दैवतांच्या रंगालाच “अशुभ’ मानणार का?
शंकराच्या पिंडीवर पांढरे फूल वाहिले जाते. पण पिंडीचा रंगही काळाच आहे. सृष्टीच्या सृजनाचे
प्रतीक असलेल्या शिवलिंगाचाही रंग काळा आहे.
पाहती सारे जरी वाईट
दृष्टीने मला!
मी कसा आहे; विचारा
पंढरीच्या विठ्ठलाला!
मीच शरयूच्या जळी अन् मीच
कालिंदीतही…..
रामही अन् कृष्णही माझ्यात
मी सामावला!!!
काही लोक जेव्हा सावळ्या रंगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात,तेव्हा त्या मुलीला काय वाटत असेल ???
किती न्यूनगंड निर्माण होत असेल ,, याची कल्पना तिलाच समजू शकते. पण काही लोक असे आहेत
कि सावल्या रंगापेक्षा अंतरंगाला ते जास्त महत्व देतात.आणि तेच जास्त महत्चाच असत...
म्हणतात ना...
अगर आप किसीको अच्छे लगे...
तो अच्छे आप नाही वो होते ही,,,
क्योंकी अच्छाई देखनेकी नजर ...
उनके पास होती है……
सोचको बदलो...नजरे
बदल जायेंगे......
हा माझा पहिला लेख आहे... माझा अनुभव म्हटले तरी चालेल.... पण कधी कधी असे वाटते....
माझा रंग माझ्यासाठी शाप आहे का??? पण मी असा विचार कधीच करणार नाही.... माझ्या आईने
मला सांगितले आहे... कि माझ्यासारखे या जगात कुणीच नाही... अगदी प्रत्तेकाच्या हाताच्या
बोटांची चक्र पण वेगळे आहेत.... बनवणार्याने आपल्याला कसे बनवले असेल????
आपण पण त्याचाच अंश आहोत....
मग तो जर इतका सुंदर असेल तर आपण हि सुंदरच आहोत....
गरज आहे ती फक्त नजर बदलण्याची...दृष्टीकोन बदलण्याची.....
क्षितिजाकडे पाहण्याच्या दृष्टीची..........
माझा लेख जे लोक वाचतील त्यांना फक्त एकच विनंती आहे....."रंग माझा ओळखावा............"
~ रोहिणी
No comments:
Post a Comment