Wednesday, 2 January 2013


आरक्षण नको... संरक्षण द्या.....

तरुणाई जागी होते तेव्हा जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो.... दामिनीच्या घटनेतून पूर्ण भारत देश खडबडून जागा झाला.... काल पेपरमध्ये बातमी होती...." ती गेली .. मशाल पेटवून...." अरे पण मला म्हणायचे आहे... तुम्ही जागे होण्यासाठी कुणीतरी जाण्याचीच वाट पाहत का???? रोज अशा कित्तेक घटना घडतात.... तेव्हा नामर्दासारखे बघ्याची भूमिका घेतात... आज मुलीना आरक्षण तर मिळाले आहे.... पण संरक्षणाचे काय? आम्हाला आरक्षण नको.... कारण आमच्यात qualiti  आहे....  आमच्यात कर्तुत्व आहे... द्यायचेच असेल तर संरक्षण द्या... कारण तसे पाहायला गेले तर स्त्री एक शक्ती आहे.. मनात आणले तर काहीही करू शकते.... पण कधी कधी हि शक्ती कमी पडते.... हतबल  होते... निराश होते.... पुरुषांच्या तुलनेत ती कमीच असणार... खरच आता आरक्षणाची गरज नाही.... कारण आमच्याकडे गुणवत्ता आहे... गरज आहे ती संरक्षणाची.....आत्मसंरक्षणाची .....
आज आपल्यावर काळा दिवस साजरा करण्याची वेळ येते...ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे... कारण जे काही झाले ते आपल्या संस्कृतीत नाही.... एखाद्याच्या शरीरासोबत आत्म्याचाही खून करण्यासारखेच.... हे थांबलेच पाहिजे....
आत्ता आपले तरुण जागे झाले,,, कित्तेक तरुणांनी शोक व्यक्त केला.... पण नुसता शोक व्यक्त करून... आणि मेणबत्त्या पेटवून ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल का????
रस्त्यावरून  बसमधून कुठेही जात असताना हीच तरुण मुले मुलींवर काय काय comments करत असतात... काहीजण  शिट्ट्या मारतात... काही बघून हसतात तर काही घाणेरड्या पद्धतीने  छेड काढतात... काहीजण पुरुषार्थ हरवून बसलेले.... फक्त बघ्याची भूमिका घेतात... तर काहीजण स्वताला आया-बहिणी नसल्यासारखे वागतात ... जसे काही आपले काही कर्तव्यच नाही... आपल्याला काय करायचे आहे... ती मुलगीच तशी असेल...... म्हणून मुलीला दोष देवून रिकामे होतात...असा हा आपला समाज.. कधी सुधारेल????? अशा किती दामिनिंच्या समोर मेणबत्त्या पेटवल्यानंतर सुधारेल??????
" युवाशक्ती हीच राष्ट्र शक्ती " अगदी बरोबर आहे... एक युवक किवा युवति सुधारली तर कित्तेक पिढ्या सुधारतील.... काळाची गरज आहे.... विचार बदलण्याची.... फक्त बोलून, शोक व्यक्त करून आणि मेणबत्त्या पेटवून काही होत नसते..... हि वेळ आहे... चांगला सुसंस्कृत समाज घडवण्याची... त्यासाठी उपोषण करायची आणि मोर्चे काढायची गरज नाही... तर प्रत्तेक व्यक्तीने आपली नीतीमत्ता ओळखून नैतिकतेने वागले पाहिजे.... फक्त पुरुषांनीच नाही तर स्त्रियांनीही ... प्रत्येक आई-बापाने आपल्या मुलीला बाहेर एकटीला फिरण्यास प्रतिबंध घालण्यापेक्षा,आपल्या मुलास स्त्रिचा आदर करायला शिकवले तर ते जास्त फायदेशीर ठरेल....कायदा बदलण्यापेक्षा विचार बदलले तर गुन्ह्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.....
                                                                                                               ~रोहिणी शिंदे

2 comments: