Thursday, 25 April 2013




कितीही सुंदर चेहरा असला तरी
त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी
फक्त आकर्षून घेण्यासाठी
त्या चेहऱ्याचा उपयोग होतो...
पण खंर प्रेम मिळवायचं असेल
न कायमच कुणाला वेड लावायचं असेल..,
तर फक्त सुंदर मनाचाच उपयोग होऊ शकतो
सुंदर मनावर झालेलं प्रेम दूर जाऊनही मन विसरू शकत नाही
कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही...........



Sunday, 14 April 2013


मुझे क्या बेचेगा रुपैया???

"एका क्षणात दृष्टीकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही. जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्विकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे." महोत्सव  या पुस्तकातील व. पु. काळे यांचे हे अतिशय सुंदर वाक्य आहे.एक चांगला विचार माणसाचे आयुष्य बदलू शकतो.बदलाव हा माणसाचा स्वभाव आहे.आणि चांगल्या गोष्टींसाठी बदल झाले तर हि गोष्ट कोणत्या महोत्सवापेक्षा कमी नाही.

हुंडा देणे किवा घेणे हि आपली संस्कृती आहे का? कुठून आला हा शब्द? पूर्वीच्या काळात धर्मशास्त्रात असे लिहून ठेवण्यात आले होते कि लग्न करताना नवरदेवाला वरदक्षिणा दिल्याशिवाय कन्यादान हा विधी पूर्ण होत नाही.म्हणून लग्नाच्या वेळी नवरदेवाला काहीतरी रोख रक्कम वरदक्षिणा म्हणून दिली जात असे. आणि मग हीच कन्यादानाची पद्धत म्हणून प्रचलित झाली. वधूपक्षांनी काहीतरी रक्कम किवा वस्तू स्वरुपात वरपक्षाला देणे.त्या काळी वरदक्षिणा हि प्रेमापोटी किवा जिव्हाळ्यापोटी  दिली जात असे. आज हे स्वरूप बदलून त्याची जागा एका वेगळ्याच समस्यांनी घेतली आहे.पूर्वीच्या काळी या पद्धतीत कुठलाही दबाव नसे.पण कालांतराने त्याचे स्वरूप जबरदस्तीने घेतले आहे.

हुंडयासारखी समस्या आजही समाजात ज्वलंत दिसून येते. आजही आपण हुंडयापायी नववधुंचा छळ, हुंडाबळीच्या घटना ऐकतो.पूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा होता पण आज समाजात काही वेगळेच चित्र दिसून येते. आज लढाईचे चित्र पालटले. चांगल्या विचारांचा लढा  वाईटाशी आहे.अर्थात अंतिम विजय सत्याचाच असेल.

आज एकीकडे महिला-पुरुष समानतेचा नारा दिला जातो आणि दुसरीकडे हुंडाबळी सारखी अनेक उदाहरणे ऐकून अगदी त्याच्या विसंगत वागले जाते. आई-वडील मुलीला मुलाप्रमाणे वाढवतात त्यांच्या बरोबरीने समाजात वावरता यावे यासाठी त्यांना योग्य ते शिक्षण देतात,पण लग्नाच्या वेळी हेच आई-वडील जे ताठ मानेने सांगतात माझी मुलगी आज डॉक्टर आहे, इंजिनियर आहे , त्यांना हुंडा पध्‍दतीमुळेच वरपक्षापुढे नमावे लागते.वधूपक्षापेक्षा  वरपक्षाला जास्त महत्व देण्यात  येते.

मध्ये आमीरच्या ‘सत्यमेव जयते’ या शो मधून याच अनिष्ठ रुढीला वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला. पण या चालीरीती वर्षानुवर्षे वाढतच चाललेल्या दिसतात. आज-काल मुला मुलींच्या पसंतीच्या आधी "तुम्ही किती देणार???" हा प्रश्न विचारला जातो. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट म्हणजे मुलगा वू मुलगी दोघे कमावते असले तरी या गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते. लाखांवर पैसा आणि किलोभर सोन्यात मुलीचा सौदा केला जातो. प्रत्तेक बापाला आपली मुलगी सोन्याहून प्रिय असणारच,तिच्या सुखासाठी सगळे मान्यच  केले जाते. पण कुठपर्यंत??? "लालचका कोई अंत नही होता" कुठेतरी आपले विचार बदलले पाहिजेत.

म्हणतात प्रत्तेकाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. पण मने जुळण्याच्या आधी इथे तोलामोलाची भाषा केली जाते. लग्न म्हणजे हिशेबाच्या वहीसारखी गत झाली आहे. पंचवीस वर्षे लाडात वाढलेली मुलगी एका नवीन प्रेमाच्या बंधनात बांधली जाणार असते. पण ते प्रेम जर पैशात मोजले जात असेल तर त्या मुलीने काय करावे असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.

हुंडा पध्दतीचे निर्मूलन करणे म्हणजे आपली मानसिकता बदलण्याचे मोठे आवाहन सर्व समाजापुढे आहे. हुंडा पध्दतीविषी जी मानसिकता समाजात आहे ती बदलणे तरुण पिढीच्या  व युवा शक्तीच्याच हाती आहे.एक चांगला विचार माणसाचे आयुष्य बदलू शकतो आणि हि युवाशक्ती सुसंस्कृत समाज घडवू शकते.

या लेखातून फक्त एवढेच सांगायचे होते कि,"गरज आहे ती फक्त नजर बदलण्याची...दृष्टीकोन बदलण्याची.....विचार बदलण्याची....क्षितिजाकडे पाहण्याच्या दृष्टीची.........."





                                                                                    प्रा.रोहिणी अर्जुनराव शिंदे.
                                                                 2beyondthedestination@gmail.com

Wednesday, 3 April 2013




बाबुल प्यारे सजन सखा रे
सून ओ मेरी मैय्या
बोझ नहीं मै किसी कि सर का
ना मजधार में नैय्या
पतवार बनुंगी
लेहारोंसे लडूंगी
अरे मुझे क्या बेचेगा रुपैया???

कल बाबा कि उंगली को थामे चली थी
कल बाबा कि लाठी भी बन जाउङ्गि
अम्मा तेरे घरोन्दे कि चिडिया हु मै
दाना लेकर हि वापस घर आउङ्गि
जिसकी फितरत में हैरत समाई नही
जिसको दौलत से ज्यादा मै भाई नही
ऐसे साजन कि मुझे जरूरत नही
ना केहेने का सुनलो मुहरत यही
अकेली चलुंगी
किस्मत से मिलुंगी
अरे मुझे क्या बेचेगा रुपैया???

दिल से दिल के तार तो जुडे नही
दो रसमोपे दौलत ये काहे बहे
हम दो प्यार कि ख्वाहिश में रिश्ते बूने
दो रिश्तो में लालच हम काहे सहे
क्या शादी के आगे जिंदगीहि नही
जो शादी हिसाबो कि केवल है वही
ऐसे शादी कि मुझको जरूरत नही
ना केहेने का सुनलो मुहरत यही
सुबह सी खिलुंगी
रतिया सी भरुंगी
अरे मुझे क्या बेचेगा रुपैया???

Saturday, 26 January 2013


ऋण....
न ऋण फिटे जन्मदेचे....जन्म दिलेल्या मातेचे ऋण,पालन-पोषण केलेल्या पित्याचे ऋण, चार चौघात मान वर करून ज्यांच्यामुळे बोलू शकतो तसेच ज्यांनी अज्ञानापासून ज्ञानाकडे , अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला  अशा गुरूंचे ऋण. काही केल्या आपण फेडू शकत नाही हेच खरे.
याहून एक वेगळेच ऋण असते जे मला आज समजले.... ते म्हणजे समाज ऋण .....
समाज हा आपल्यासारख्या लोकांनीच बनलेला असतो.आपण या समाजाचे अविभाज्य घटक आहोत.
ज्या समाजात आपण वावरतो, ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खरच खूप आनंद होतोय.
स्वतःवरची नजर हटली कि इतरांमधले सौदर्य दिसू लागते.माणूस कधी कधी स्वतःच्याच दु:खात इतका हरवून जातो कि आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षाही कितीतरी पटीने दु:खी लोक असतात हे विसरूनच जातो.दुसर्याचे अश्रू पुसून स्वता:चे दु:ख विसरण्याचा एक मार्ग आहे असे म्हटले तरी चालेल.
मी हिंदू धर्मातली आहे याचा मला सार्थ अभिमान तर आहेच.पण याच बरोबर मी अशा आई-वडिलांची मुलगी आहे. ज्यांना मी देवाच्याही आधी मानते.देव कुणी पाहिलाय असे आपण म्हणतो पण खरे तर रोजच त्याचे दर्शन होते आई-वडिलांच्या रुपात.आपल्या लेकरांच्या हजारो चुका पोटात घालून हसत माफ करते ती विशाल अंत:करणाची आई. आणि नारळासारखे वरून कठीण कवच आणि आत मात्र पांढरेशुभ्र मन असणारे वडील.
पर्वता सारखे वडील तर नदी सारखी आई ,
त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही.
लहानपणापासून दुसर्याचा विचार करायला लावणारे संस्कार त्यांनी दिले, प्रत्तेकाला वेगळा खाऊ न आणता एकत्र एका ताटात खाण्याचा आनंद त्यांनी दाखविला.  हे सगळे त्यांनी शब्दात नाही तर त्यांच्या कृतीतून आम्ही आचरण केले. घरी मागायला येणाऱ्या मागताकर्याना कधी रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये. आपण जेवत असलो तर आपल्यातली अर्धी भाकरी त्यांना द्यावी...हे सगळे संस्कार..
वाढदिवसाच्या  दिवशी केक कापून पार्ट्या न करता औक्षण करून भरभरून आशीर्वाद देणारी माझी आई. तिने आज मला माझ्या वाढ-दिवसाच्या दिवशी भगवद्गीता द्यावी हे खरच खूप अनपेक्षित होते माझ्यासाठी. कारण दर-वर्षी मित्र-मैत्रिणींसोबत मी माझा वाढ-दिवस साजरा करायचे. नेहमी वाटायचे कि मला एखादे पुस्तक द्यावे  कुणीतरी गिफ्ट म्हणून. पण सगळ्या मैत्रिणी काही तरी शोभेची वस्तू वगरे द्यायच्या ज्याचे मला फारसे आकर्षण नाही. पण आईच्या या गिफ्ट ने  मला खूप आनंद झाला.
हे सगळे शिकत असताना.. जेव्हापासून समजतंय तेव्हापासून  नेहमी असे वाटायचे कि समाजात किती गरीब परिस्थिती आहे,मला यांच्यासाठी काही करता येईल का? अगदी लहानपणापासून कुठे अपंगत्व,गरिबी, लाचारी पहिली कि मन अस्वस्थ व्हायचे,का कुणास ठाऊक मन उदास व्हायचे.मी सायकल चालवायचे तेव्हा आई म्हणायची अगं चालणार्यांकडे बघ,पण माझे लक्ष पाय नसणार्यांकडे  जायचे.त्यामुळे कधी श्रीमंती,पैसा अशा गोष्टीचे आकर्षण,हव्यास वाटलाच नाही.
या वेळी परत ५ nov दिवस उजाडला,अगदी नकोसा वाटतो हा दिवस, असे वाटते ३६५ दिवसांमध्ये हा दिवसच येऊ नये. पण आला..या वर्षी मन खूप उदास होते.अश्रूंच्या सागरात बुडून गेले होते.भैयाने cadbury  celebration  दिले उठल्या उठल्या..अश्रुंचे हुंदके आवरले,आई-वडिलांचे दर्शन घेऊन कॉलेजमध्ये गेले..माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी, मैत्रिणीनी मनापासून wish  केले, टेबलापुढे खूप सारी चोकलेट आली, आम्ही सर्वांनी मिळून खाल्ली. तेवढ्यात एका मुलीने प्रश्न केला,"madam तुम्ही तुमचा वाढ-दिवस कसा साजरा करणार आहेत?" ह्या प्रश्नाने मनात असे घर केले कि मी नेहमी म्हणते कि मला कुणासाठी तरी काही करायचे आहे... पण नुसते म्हणून चालेल का? कृती कधी करणार? सुविचार सांगायला कुणालाही येतात पण आचरणात कधी आणायचे? ताबडतोब एक निर्णय घेतला कि आपण एखाद्या आश्रम शाळेत किवा अनाथ आश्रमात वाढ-दिवस  साजरा करूया,ज्यामुळे तिथल्या चिमुरड्या पिलांसाठी काहीतरी करता येईल. आणि हि  केलेली कल्पना खरच साकारली.

आई-बाबांच्या जीवावर करताना थोडा कमीपणा वाटला असता, पण आता मी कमवायला लागले होते, आपल्या तुटपुंज्या पगारीत्ला खारीचा वाटा त्या निष्पाप जीवासाठी खर्च करावा असे वाटले आणि आम्ही त्यांच्यासाठी खाऊ आणला, चोकलेट आणले, पेनही आणले. तिथे गेल्यावर त्या सगळ्या मुलांना खूप आनंद झाला. ते कुतूहलाने बघत होते आमच्याकडे.मी,आई-बाबा,आणि माझ्या दोन मैत्रिणी आम्ही सर्वजण गेलो. सर्वांसाठी हा नवीन अनुभव होता.
लहान मुलांना केक फार आवडत असतो.तिथल्याच एका सर्वात छोट्या मुलाला बोलावले आणि त्याच्याकडून केक कापला. सगळे "HAPPY  BIRTHDAY  TO  YOU" म्हणत होते.आतून मन एकसारखे भरून येत होते.
त्यानंतर खाऊ वाटप  झाले, पेन दिले. सगळी मुले इतकी खुश झाली जणू काही ते माझे खूप जवळचे कुणीतरी आहेत असे अवघ्या अर्ध्या तासात नाते निर्माण झाले. तिथे बसलेल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले "HAPPY  BIRTHDAY  TO  YOU रोहिणी ताई"  अजूनही आवाज घुमतोय त्यांचा.
त्यातच दुग्ध-शर्करा योग म्हणजे आश्रम शाळेचे मालक म्हणजे माझे शिक्षक, त्याना मला पाहून इतका आनंद झाला होता तो त्यांनी शब्दात व्यक्त केला.यानंतर आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना म्हणालो..
इतनी शक्ति हमें दे न दाता
मनका विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रास्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना............
या अर्थपूर्ण आणि आर्त भावनेच्या प्रार्थने नंतर आईने मला भगवद्गीता दिली अर्थासह त्यामुळे तर हा आनंद द्विगुणीत झाला.आणि आभार मानून हा कार्यक्रम संपला आणि अखेर त्या चिमुरड्यांचा निरोप घेण्याची वेळ आली.
सगळी मुले "Bye  रोहिणी ताई " म्हणू लागली, एवढ्या कमी वेळात त्यान्ह्च्याशी लळा लागला होता, जाताना वाईट तर वाटतच होते पण मनात एक वेगळाच आनंद होता, सुख होते कि या जगात खूप अंधार आहे, तो घालवण्यासाठी फार काही नाही पण एक छोटीशी पणती पेटवली.