Saturday 26 January 2013


ऋण....
ऋण फिटे जन्मदेचे....जन्म दिलेल्या मातेचे ऋण,पालन-पोषण केलेल्या पित्याचे ऋण, चार चौघात मान वर करून ज्यांच्यामुळे बोलू शकतो तसेच ज्यांनी अज्ञानापासून ज्ञानाकडे , अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला  अशा गुरूंचे ऋण. काही केल्या आपण फेडू शकत नाही हेच खरे.
याहून एक वेगळेच ऋण असते जे मला आज समजले.... ते म्हणजे समाज ऋण .....
समाज हा आपल्यासारख्या लोकांनीच बनलेला असतो.आपण या समाजाचे अविभाज्य घटक आहोत.
ज्या समाजात आपण वावरतो, ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खरच खूप आनंद होतोय.
स्वतःवरची नजर हटली कि इतरांमधले सौदर्य दिसू लागते.माणूस कधी कधी स्वतःच्याच दु:खात इतका हरवून जातो कि आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षाही कितीतरी पटीने दु:खी लोक असतात हे विसरूनच जातो.दुसर्याचे अश्रू पुसून स्वता:चे दु:ख विसरण्याचा एक मार्ग आहे असे म्हटले तरी चालेल.
मी हिंदू धर्मातली आहे याचा मला सार्थ अभिमान तर आहेच.पण याच बरोबर मी अशा आई-वडिलांची मुलगी आहे. ज्यांना मी देवाच्याही आधी मानते.देव कुणी पाहिलाय असे आपण म्हणतो पण खरे तर रोजच त्याचे दर्शन होते आई-वडिलांच्या रुपात.आपल्या लेकरांच्या हजारो चुका पोटात घालून हसत माफ करते ती विशाल अंत:करणाची आई. आणि नारळासारखे वरून कठीण कवच आणि आत मात्र पांढरेशुभ्र मन असणारे वडील.
पर्वता सारखे वडील तर नदी सारखी आई ,
त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही.
लहानपणापासून दुसर्याचा विचार करायला लावणारे संस्कार त्यांनी दिले, प्रत्तेकाला वेगळा खाऊ आणता एकत्र एका ताटात खाण्याचा आनंद त्यांनी दाखविलाहे सगळे त्यांनी शब्दात नाही तर त्यांच्या कृतीतून आम्ही आचरण केले. घरी मागायला येणाऱ्या मागताकर्याना कधी रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये. आपण जेवत असलो तर आपल्यातली अर्धी भाकरी त्यांना द्यावी...हे सगळे संस्कार..
वाढदिवसाच्या  दिवशी केक कापून पार्ट्या करता औक्षण करून भरभरून आशीर्वाद देणारी माझी आई. तिने आज मला माझ्या वाढ-दिवसाच्या दिवशी भगवद्गीता द्यावी हे खरच खूप अनपेक्षित होते माझ्यासाठी. कारण दर-वर्षी मित्र-मैत्रिणींसोबत मी माझा वाढ-दिवस साजरा करायचे. नेहमी वाटायचे कि मला एखादे पुस्तक द्यावे  कुणीतरी गिफ्ट म्हणून. पण सगळ्या मैत्रिणी काही तरी शोभेची वस्तू वगरे द्यायच्या ज्याचे मला फारसे आकर्षण नाही. पण आईच्या या गिफ्ट ने  मला खूप आनंद झाला.
हे सगळे शिकत असताना.. जेव्हापासून समजतंय तेव्हापासून  नेहमी असे वाटायचे कि समाजात किती गरीब परिस्थिती आहे,मला यांच्यासाठी काही करता येईल का? अगदी लहानपणापासून कुठे अपंगत्व,गरिबी, लाचारी पहिली कि मन अस्वस्थ व्हायचे,का कुणास ठाऊक मन उदास व्हायचे.मी सायकल चालवायचे तेव्हा आई म्हणायची अगं चालणार्यांकडे बघ,पण माझे लक्ष पाय नसणार्यांकडे  जायचे.त्यामुळे कधी श्रीमंती,पैसा अशा गोष्टीचे आकर्षण,हव्यास वाटलाच नाही.
या वेळी परत nov दिवस उजाडला,अगदी नकोसा वाटतो हा दिवस, असे वाटते ३६५ दिवसांमध्ये हा दिवसच येऊ नये. पण आला..या वर्षी मन खूप उदास होते.अश्रूंच्या सागरात बुडून गेले होते.भैयाने cadbury  celebration  दिले उठल्या उठल्या..अश्रुंचे हुंदके आवरले,आई-वडिलांचे दर्शन घेऊन कॉलेजमध्ये गेले..माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी, मैत्रिणीनी मनापासून wish  केले, टेबलापुढे खूप सारी चोकलेट आली, आम्ही सर्वांनी मिळून खाल्ली. तेवढ्यात एका मुलीने प्रश्न केला,"madam तुम्ही तुमचा वाढ-दिवस कसा साजरा करणार आहेत?" ह्या प्रश्नाने मनात असे घर केले कि मी नेहमी म्हणते कि मला कुणासाठी तरी काही करायचे आहे... पण नुसते म्हणून चालेल का? कृती कधी करणार? सुविचार सांगायला कुणालाही येतात पण आचरणात कधी आणायचे? ताबडतोब एक निर्णय घेतला कि आपण एखाद्या आश्रम शाळेत किवा अनाथ आश्रमात वाढ-दिवस  साजरा करूया,ज्यामुळे तिथल्या चिमुरड्या पिलांसाठी काहीतरी करता येईल. आणि हि  केलेली कल्पना खरच साकारली.

आई-बाबांच्या जीवावर करताना थोडा कमीपणा वाटला असता, पण आता मी कमवायला लागले होते, आपल्या तुटपुंज्या पगारीत्ला खारीचा वाटा त्या निष्पाप जीवासाठी खर्च करावा असे वाटले आणि आम्ही त्यांच्यासाठी खाऊ आणला, चोकलेट आणले, पेनही आणले. तिथे गेल्यावर त्या सगळ्या मुलांना खूप आनंद झाला. ते कुतूहलाने बघत होते आमच्याकडे.मी,आई-बाबा,आणि माझ्या दोन मैत्रिणी आम्ही सर्वजण गेलो. सर्वांसाठी हा नवीन अनुभव होता.
लहान मुलांना केक फार आवडत असतो.तिथल्याच एका सर्वात छोट्या मुलाला बोलावले आणि त्याच्याकडून केक कापला. सगळे "HAPPY  BIRTHDAY  TO  YOU" म्हणत होते.आतून मन एकसारखे भरून येत होते.
त्यानंतर खाऊ वाटप  झाले, पेन दिले. सगळी मुले इतकी खुश झाली जणू काही ते माझे खूप जवळचे कुणीतरी आहेत असे अवघ्या अर्ध्या तासात नाते निर्माण झाले. तिथे बसलेल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले "HAPPY  BIRTHDAY  TO  YOU रोहिणी ताईअजूनही आवाज घुमतोय त्यांचा.
त्यातच दुग्ध-शर्करा योग म्हणजे आश्रम शाळेचे मालक म्हणजे माझे शिक्षक, त्याना मला पाहून इतका आनंद झाला होता तो त्यांनी शब्दात व्यक्त केला.यानंतर आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना म्हणालो..
इतनी शक्ति हमें दे दाता
मनका विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रास्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना............
या अर्थपूर्ण आणि आर्त भावनेच्या प्रार्थने नंतर आईने मला भगवद्गीता दिली अर्थासह त्यामुळे तर हा आनंद द्विगुणीत झाला.आणि आभार मानून हा कार्यक्रम संपला आणि अखेर त्या चिमुरड्यांचा निरोप घेण्याची वेळ आली.
सगळी मुले "Bye  रोहिणी ताई " म्हणू लागली, एवढ्या कमी वेळात त्यान्ह्च्याशी लळा लागला होता, जाताना वाईट तर वाटतच होते पण मनात एक वेगळाच आनंद होता, सुख होते कि या जगात खूप अंधार आहे, तो घालवण्यासाठी फार काही नाही पण एक छोटीशी पणती पेटवली.

2 comments: